बियाणासाठी शेतकर्‍यांना मोजावी लागते 50 टक्के रक्कम जादा

May 23, 2011 3:27 PM0 commentsViews: 4

23 मे

कापसाच्या बियाण्याच्या मुद्यावरुन आता राजकीय पक्षांनीही आंदोलनास सुरुवात केली आहे. जळगावला बियाण्यांचा होत असलेला काळाबाजार आणि रासायनिक खतांची कृत्रीम टंचाई या मुद्यावरुन शिवसेनेनं कृषी अधिकार्‍यांना धारेवर धरलं.

कापसाची लागवड करण्याची वेळ आली तरी बाजारात असलेला बियाणांचा तुटवडा आणि व्यापार्‍यांंकडून होत असलेली लूट यामुळे शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त झाले आहेत.

काळाबाजारात 200 ते 250 रुपये जास्त भावाने बियाणं घेत असतांना कराव्या लागणार्‍या लिकींगमुळे बियाणांसाठी अतिरिक्त 50 टक्के रक्कम शेतकर्‍याला मोजावी लागतेय. नेमका हाच मुद्दा पकडून शिवसेनेनं आता शेतकर्‍यांची बाजू घेतली आहे.

close