शेतकरी संघटनेच अर्ध नग्न अवस्थेत बोंब मारो आंदोलन

May 23, 2011 10:33 AM0 commentsViews: 2

23 मे

तुळजाभवानी शेतकरी सहकारी कारखान्याकडील थकीत ऊस बीलाचे लवकरच वाटप व्हावे यासाठी आज उस्मानाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेनं अर्ध नग्न अवस्थेत बोंब मारो आंदोलन केलं.

गेल्या वर्षभरापासून हा कारखाना दृष्टी उद्योग समुहाकडे चालविण्यासाठी देण्यात आला होता. तेव्हापासून शेतकर्‍यांची बिलं न मिळाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं.

सध्या हा कारखाना महाराष्ट्र राज्याचे दूग्ध विकास मंत्री तसेच उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकर चव्हाण यांच्या ताब्यात असल्याने हे आंदोलन चर्चेचा विषय ठरला आहे.

close