फीवाढी विरोधात पालकांची शाळेत तोडफोड

May 23, 2011 12:38 PM0 commentsViews: 2

23 मे

प्रवेश शुल्कावरुन संतप्त पालकांनी शाळेतील फर्नीचरची तोडफोड केली. नंदिनीबाई मुलींच्या शाळेत प्रवेश शुल्काच्या नावाखाली 50 रुपयांची पावती देऊन शाळा 1100 घेत असल्याची तक्रार पालकांनी शिक्षणाधिकार्‍यांना केली होती.

हे 1100 दिले नाही तर शाळा ऍडमिशन द्यायला नकार देत असल्याने पालक हतबल झाले होते. पण शिक्षणविभागाने केलेलं दुर्लक्ष आणि शाळा व्यावस्थापनाचे आडमुठेपणाचे धोरण यामुळे पालकांच्या संतापाचा उद्रेक झाला. कार्यालयाबाहेरील फलक, खुर्ची यांची तोडफोड त्यांनी सुरु केली.

close