अवैध दारूच्या विरोधात रणरागिणींनी रणशिंग फुंकले

May 23, 2011 3:44 PM0 commentsViews: 6

23 मे

औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हळदा गावातील महिलांनी उपोषण सुरू केलंय. सिल्लोड तालुक्यातील हळदा या गावात हातभट्टीची आणि देशी दारूची बेकायदा सर्रास विक्री होते.

या विरूद्ध महिलांनी गावात फिरून दारूचे अड्डे उद्धस्त करून ग्रामीण पोलिसांकडे तक्रारी केल्या. पण पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही. महिलांच्या या संघर्षाची कहाणी आयबीएन लोकमतने दाखविल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने काही दारूचे अड्डे बंद केले.

पण त्यानंतर देशी दारूची विक्री करणारे गावात शिरले आणि या महिलांसमोर त्यांनी पुन्हा आव्हान उभं केलं. त्याच्या निषेधार्थ महिलांनी आता उपोषण सुरू केलं आहे.

गावात अवैध दारू विक्री करणार्‍या गावगुंडांना तडीपार केल्याशिवाय आणि दारू विक्रेत्यांवर कारवाई केल्याशिवाय मागे हटायचं नाही असा निर्धार या रणरागिणींनी केला आहे.

close