‘बेटी बचाव’ची हरित चळवळ

May 23, 2011 3:53 PM0 commentsViews: 106

प्रभाकरकुमार, बिहार

23 मे

स्त्री पुरुषांच्या व्यस्त होत जाणार्‍या प्रमाणाबद्दल सतत बोललं जातं, लिहीलं जातं. पण तोडगा मात्र काढला जात नाही. पण बिहारमधल्या एका गावाने मात्र यावर एक उपाय शोधून काढला आहे.

बिहारच्या भागलपूरमधल्या धहरा गावाने मुलींना वाचवण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. आणि सोबत हरीत चळवळीलाही हातभार लावला आहे.मुलगी असणं ही धहरा गावासाठी आनंदाची गोष्ट आहे. मुलगी झाली की येथील गावकरी 10 आंब्याची झाडं लावतात. परिणामी गावाच्या परिसरात जवळपास 20 हजार आंब्याची झाडं दिसतात. भागलपूरमधील हा मोठा हरितपट्टा समजला जातोय. शिवाय स्त्री-पुरुष प्रमाणही इथे चांगलं दिसतंय.

धनदौलतीचं प्रतिक असलेली लक्ष्मी, मुलीच्या रुपात लक्ष्मीच घरात आली असा वर्षानुवर्षाचा समज आहे. धहरा गावासाठी तर प्रत्यक्षात लक्ष्मीच गावात आली. आंब्याच्या झाडात वसणारी ही ऐश्वर्यसंपन्न लक्ष्मी.

धहरा गावाच्या या प्रयत्नांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचही लक्ष वेधून घेतलं. त्यांनीही वृक्षारोपण करत मुलींसाठी शाळा बांधण्यावर भर दिला.

मुलींना देवाची देणगी असल्यासारखे वागवा आणि झाडांना बँकेतली पुंजी असल्यासारखे हाच संदेश बिहारच्या गावोगावात कसा जाईल यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत

close