मास्टर कार्डच्या सर्व्हेत मुंबई अव्वल

November 11, 2008 10:35 AM0 commentsViews: 3

11 नोव्हेंबर, दिल्लीशिशिर सिन्हामास्टरकार्ड या क्रेडिट कार्ड कंपनीनं, आर्थिक सेवांचा निष्कर्ष लावून जगातल्या सर्व शहरांमध्ये मुंबईला अव्वल क्रमांक दिला आहे. जगातल्या पासष्ट शहरांमधून मास्टरकार्डनं मुंबईतल्या आर्थिक सेवा उत्तम असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण मंदीच्या या काळात मुंबईत उधारीवर खर्च करण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं असं मास्टरकार्डचं म्हणणं आहे.जगातल्या तीस आर्थिकदृष्ट्या प्रगत मार्केट्समध्ये आणि पासष्ट शहरांमध्ये बँकिंग सेवा, करन्सी एक्स्चेंज रेग्युलेशन आणि इतर आर्थिक सेवा देण्यात मुंबई पहिल्या क्रमांकांवर आहे. या सर्वेक्षणाचा परदेशी पर्यटकांना फायदा होईल, असं मास्टर कार्डनं म्हटलं आहे.मात्र मंदीमुळे येत्या काळात लोकं क्रेडिट कार्डचा वापर तोलून-मापूनच करतील असं मास्टरकार्डचं मत आहे. ' गेल्या दहा-पंधरा वर्षात इथं क्रेडिट कार्डाचा वापर वाढलाय. पण त्यामुळे मंदीचा प्रभाव पडणार नाही असं सांगता येत नाही ' असं मत मास्टरकार्डचे आर्थिक सल्लागार युवा हेड्रिक वांग यांनी व्यक्त केलं.कंपनीच्या मते बंगळुरू किंवा हैद्राबादसारख्या आय.टी चा वापर असणार्‍या शहरांमध्ये क्रेडिट कार्डच्या वापराचं प्रमाण कमी होऊ शकतं मात्र एकूणच सर्वेक्षण पाहून क्रेडिट कार्डचा वापर करण्याचं प्रमाण इतक्यात तरी कमी होणार नाही असं मास्टरकार्ड कंपनीला वाटत आहे.

close