खा. सदाशिवराव मंडलिक काँग्रेसच्या वाटेवर

May 24, 2011 10:24 AM0 commentsViews: 99

24 मे

कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत. त्या संदर्भात त्यांची विविध पातळीवर चर्चा सुरु आहे. येत्या काही दिवसात ते काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मतभेद निर्माण झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला धुळ चारुन राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला काबीज केला.

एवढच नव्हे तर सरकार स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबाही दिला. खासदार मंडलिक हे राष्ट्रवादीला शह देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करतायत.

त्याचाच एक भाग म्हणून ते काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या तयारीत आहेत. सध्या ते आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असून येत्या काही दिवसात ते मुंबई आणि दिल्ली येथील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, सदाशिवराव मंडलिक काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

close