नाशकात नफा कमवण्याचा आमिष दाखवून लोकांची फसवणूक !

May 24, 2011 8:56 AM0 commentsViews: 6

24 मे

शेळ्यामेंढ्याच्या दुधातील गुंतवणुकीचा नफा कमवण्याचा आमिष दाखवून नाशिकमध्ये लोकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. समृद्ध जीवन फूड्स इंडिया या गुंतवणूक कंपनीविरोधात या महिलेनं तक्रार केली आहे.

पाच वर्षात दामदुप्पट परतफेड देण्याच्या बोलीवर या कंपनीने लोकांकडून ठेवी गोळा करायला सुरुवात केली. नाशिकमध्ये यांचे साडेआठ हजार एजंट काम करत आहेत.

एका महिलेच्या तक्रारीनंतर भाजपने आंदोलन हाती घेत या महिलेचे 70 हजार रुपये परत मिळवून दिले. आपण लोकांना फसवत नसल्याचे कंपनीचं म्हणणं आहे. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी तीन दिवसांची मुदत मागितली आहे.

close