लवासाची जमीन आपलीच असल्याचा आदिवासींचा दावा

May 24, 2011 9:34 AM0 commentsViews: 5

24 मे

आदिवासींच्या जमिनी आपण खरेदी केल्या नसल्याचा दावा लवासाने केला असला तरी आदिवासी असल्याचा दावा करणार्‍या काही जणांच्याजमिनी थेट लवासानेच घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आलंय अशी माहिती मावळचे प्रांताधिकारी संजय पाटील यांनी दिली आहे. आज 10 आदिवासींनी याप्रकरणी प्रांताधिकार्‍यांकडे लवासाकडील जमिनी आपल्या असल्याचा दावा केला आहे.

त्यापैकी काही जमिनी लवासाने स्वता खरेदी केल्याचे समोर येतं आहे. तर काही जमिनी दुसर्‍या व्यक्तीने आदिवासींकडून लवासाला पुन्हा विकल्याचे उघड झालं आहे. प्रांताधिकारी संजय पाटील यांनी संबंधित आदिवासींना जातीचे दाखले सादर करण्यास सांगितलं आहे.

तर उर्वरित आदिवासींना त्यांची कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. तर लवासाने आपली बाजू मांडावी यासाठी लवकरच लवासालाही नोटीस देणार असल्याचे प्रांताधिकार्‍यांनी सांगितले आहे.

लवासाने आदिवासींची जमीन घेतल्या प्रकरणी आज 17 आदिवासींपैकी 10 आदिवासींनी आपले दावे मावळच्या उपविभागीय अधिकार्‍यांसमोर मांडले. महसूल विभागाने 17 आदिवासींना या प्रकरणी नोटीस काढून 24 मे रोजी कागदोपत्री पुराव्या मांडण्यास सांगितले होते.

याचबरोबर आदिवासींची काही जमीन लवासानं प्रत्यक्षपणे आणि काही जमीन अप्रत्यक्षपणे खरेदी केल्याचे या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. यामुळे आता आदिवासींची जमीन खरेदी करणार्‍या लवासा कंपनीला देखील नोटीस काढून आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती मावळचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी पत्रकारांनी दिली.

याप्रकरणाचा पाठपुरावा करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या सुनीता सू. र. यांनी या कारवाईचं स्वागत करतांना 17 आदिवासींव्यतिरीक्तचे आदिवासी आणखी काही बिगर आदिवासी अशा 170 खातेदारांच्या जमीनी परत करण्यासाठीचीही प्रक्रिया सुरू करावी अशीही मागणी सुनीती सू. र. यांनी केली.

close