कनिमोळी यांच्या जामीनवर 30 मे रोजी सुनावणी

May 24, 2011 9:45 AM0 commentsViews: 2

24 मे

टू जी प्रकरणी अटकेत असलेल्या शाहीद आणि आसीफ बलवा यांचा जामीन अर्ज सीबीआय कोर्टाने फेटाळला आहे. 2 जी प्रकरणी अटकेत असलेल्या द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना तिहार तुरूंगात 30 मेपर्यंत राहावं लागणार आहे.

कारण त्यांनी जामीनासाठी दिल्ली हायकोर्टात केलेल्या याचिकेवर आता पुढची सुनावणी 30 मे रोजी होणार आहे. दरम्यान या याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टाने सीबीआयला नोटीस बजावली आहे.

तर याच प्रकरणातील आणखी एक आरोपी करीम मोरानी याच्या अटकपूर्व जामीनअर्जावरची सुनावणीही 26 मेपर्यंत स्थगिती करण्यात आली आहे.

close