नितीन गडकरींच्या वैमानिकाला अटक

May 24, 2011 10:23 AM0 commentsViews: 1

24 मे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या विमानाच्या पायलटला अटक करण्यात आली आहे. या पायलटकडे काडतूसं सापडली आहे. रफायर जॉर्ज हर्बर्ट असं या पायलटचं नाव आहे.

तो एरो-एअर या खासगी विमान कंपनीसाठी काम करतो. आज या कंपनीचं विमान गडकरींना दिल्लीहून नागपूरला घेऊन जात होतं. ही काडतूसं आपल्याकडे कशी आली याबाबत या पायलटला स्पष्टीकरण देता आलं नाही. त्यामुळे दिल्ली एअरपोर्टवर त्याला ताब्यात घेण्यात आलं.

close