विनयभंग प्रकरणी पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर

May 24, 2011 11:07 AM0 commentsViews: 1

24 मे

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. डी. जाधव यांचा कार्यभार काढून घेण्यात आला असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलं आहे.

महिला पोलीस यांनी केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 4 डिसेंबर 2010 रोजी या महिलेनं पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षक यांच्याकडे जाधव विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक जाधव यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली.

त्यानंतर त्यांचा चंदगड पोलीस स्टेशनचा कार्यभार काढून घेवून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. कोल्हापूर पोलीस दलातील लैंगिक प्रकरण ताजं असतानाच आता हे प्रकरण बाहेर आल्यामुळे पोलिसांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

close