शिखर बँकेच्या संचालकांच्या विरोधात फौजदारी खटला

May 24, 2011 12:44 PM0 commentsViews: 3

24 मे

राज्य सहकारी बँक आणि संचालकांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव कोर्टात हा खटला दाखल करण्यात आला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळकृष्ण घाडगे यांनी हा खटला दाखल केला.

राज्य सहकारी बँकेनं फसवणूक करून कारखाना लुबाडला असा या घाडगे यांचा आरोप आहे. लिलाव प्रक्रियेत जरंडेश्वर कारखाना 65 कोटी रुपयांना गुरू कमॉडिटी सर्व्हिसेस या कंपनीला विकला गेला होता.

पण प्रत्यक्षात गुरू कमॉडिटीनं राज्य सहकारी बँकेकडे फक्त 18 कोटी रुपयेच भरले, असा दावा बाळकृष्ण घाडगे यांनी केला. वरचे पैसे कुठे गेला असा सवालही त्यांनी विचारला.

शिवाय कारखान्याचे व्हॅल्युएशन 130 कोटींचे असताना त्याची लिलाव प्रक्रिया राज्य सहकारी बँकेनं केवळ 40 कोटींपासून सुरू केली होती असा आरोपही त्यांनी केला.

close