बँकांनी बांधकाम क्षेत्राला आर्थिक मदत करावी – हिरानंदानी

November 11, 2008 11:04 AM0 commentsViews: 5

11 नोव्हेंबर मुंबई ऋतुजा मोरेबांधकाम उद्योग हा देशातला नोक-या निर्माण करणारा मोठा उद्योग आहे. पण मंदीच्या या काळात, या क्षेत्रातही अर्थपुरवठ्याचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे भविष्यात बांधकाम उद्योगातही कर्मचारी कपात झाली तर नवल नाही असं हिरानंदानी डेव्हलपर्सचे निरंजन हिरानंदानी म्हणत आहेत. हिरानंदानींनी नोक-या कमी होण्यामागे आरबीआयच्या पॉलिसीना दोषी ठरवलंय. रिझर्व्ह बँकेनं या क्षेत्राला मदत करावी अशी मागणी त्यांनी केली जोपर्यत याक्षेत्रात पैसा गुंतवला जाणार नाही तोपर्यत अनेक मोठे प्रोजेक्ट पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे इतर बँकांनी बांधकाम क्षेत्राला आर्थिक मदत करावी असंही ते म्हणाले.

close