कसाबच्या सुरक्षेचं बिल देण्यास सरकारचा नकार

May 25, 2011 7:45 AM0 commentsViews: 2

25 मे

मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबच्या सुरक्षेवर झालेला खर्च कुणी भरावा यावरून आता वाद सुरू झाला आहे. कसाबच्या सुरक्षेवर मार्च 2009 ते 30 सप्टेंबर 2010 दरम्यान तब्बल 10 कोटी रुपये खर्च झाले आहे.

कसाब सध्या आर्थररोड जेलमध्ये एका विशेष सेलमध्ये आहे. त्याच्या सुरक्षेसाठी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचे 200 जवान तैनात आहेत. आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी कसाबच्या सुरक्षेचं 10 कोटी रुपयाचे बिल महाराष्ट्र सरकारकडे पाठवले आहे. पण महाराष्ट्र सरकारने हे बिल द्यायला नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

26/11 चा हल्ला हा राज्यापुरता मर्यादित नव्हता तर तो देशावरचा हल्ला होता अशा आशयाचं पत्र सरकार आयटीबीपीला पाठवणार आहे असं गृह विभागाच्या प्रधान सचिव मेधा गाडगीळ यांनी म्हटलं आहे. याबाबत गृहमंत्री आर आर पाटील यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.

close