आदर्श प्रकरणी संरक्षण अधिकार्‍यांमध्ये मतभेद

May 25, 2011 7:53 AM0 commentsViews: 2

25 मे

आदर्श सोसायटी प्रकरणात आदर्शच्या जागेसंदर्भात संरक्षण अधिकार्‍यांमधील मतभेद उघड झाले आहे. न्यायालयीन आयोगाच्या सुनावणी दरम्यान ही बाब उघड झाली आहे.

आदर्शची जागा राज्य सरकारच्याच मालकीची आहे अशी माहिती डिफेन्स इस्टेट ऑफिसर गीता कश्यप यांनी आयोगाला दिली. आदर्शच्या इमारतीला वाढीव एफएसआय देण्यासाठी काही एनओसी देण्यात आल्या होत्या का ? असा प्रश्न विचारला असता वाढीव एफएसआय देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण ती जमीन संरक्षण खात्याच्या मालकीची नाही. असं स्पष्टीकरण गीता कश्यप यांनी आदर्श कमिशनपुढे दिलं.

close