महापालिकेच्या हद्दीत 28 खाजगी अनधिकृत शाळा

May 25, 2011 8:29 AM0 commentsViews: 7

25 मे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणार्‍या 28 खाजगी शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 28 अनधिकृत खाजगी शाळांची यादी महापालिकेनं प्रसिद्ध केली.

या 28 पैकी 16 इंग्रजी माध्यमाच्या, 11 मराठी माध्यमाच्या आणि एका हिंदी माध्यमाच्या प्राथमिक शाळेचा समावेश आहे. पण या शाळांवर अजूनही महापालिकेनं कारवाई केलेली नाही. आणि धक्कादायक बाब म्हणजे या शाळांवर कारवाई करु नये यासाठी राजकीय दबाव येत असल्याची कबुली महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतींनी दिली.

close