आयडीबीआय बँकेची लॉकर सुविधा

May 24, 2011 12:28 PM0 commentsViews: 6

24 मे

मुंबईत आयडीबीआय बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी लॉकरची सुविधा सुरु केली आहे. बँकेच्या कफ परेड शाखेपासून या सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ही सुविधा आठवड्याचे सगळे दिवस 24 तास सुरू राहील. यासाठी बायोमेट्रिक ऍक्सेस प्रणाली तयार करण्यात आली आहे. लवकरच ही सेवा बँकेच्या इतर शाखांमध्येही सुरु करण्यात येणार आहे.

आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना लॉकरचा 24 तास लाभ घेता येणार आहे. प्रत्येक लॉकर-धारकाला आपल्या लॉकरला ऍक्सेस करण्याची सुविधा दिली जाईल.

ही सेवा सध्या आयडीबीआयच्या कुलाबा शाखेमध्ये सुरू करण्यात आली आहे. इतर शहरांमध्ये सुद्धा लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

close