मेधा पाटकर यांची घेतली सरकारी अधिकार्‍यांनी भेट

May 25, 2011 8:52 AM0 commentsViews: 5

25 मे

मुंबईत महापालिकेनं गोळीबार नगरातल्या झोपड्या तोडण्याची कारवाई केली त्याविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचं आमरण उपोषण अजूनही सुरूच आहे.

त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. आज काही सरकारी अधिकार्‍यांनी मेधाताई आणि तिथल्या रहिवाशांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच खासदार प्रिया दत्त यांनीही मेधाताईंची भेट घेतली. या अगोदर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी यासंदर्भातली कागदपत्रं मागवून घेतली. पण त्यांनी कोणतंही ठोस आश्वासन मात्र दिलेलं नाही.

close