हेडली शिवसेना भवनात भेटला – रेगे

May 25, 2011 9:17 AM0 commentsViews: 3

25 मे

26/11 च्या मुंबई हल्ल्याबाबत शिकागो कोर्टात सुरू असलेल्या खटल्यातून हेडलीच्या कबुलीजबाबातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांना ठार करण्याचा कट आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा होता असं हेडलीनं कबूली जबाबात म्हटलं आहे.

आपण शिवसेनाभवनात जाऊन शूटिंग केल्याचं हेडलीनं म्हटलंय. तसेच तिथं शिवसेनेच्या राजाराम रेगे यांना आपण भेटल्याचं हेडलीनं सांगितले आहे. रेगे आता मीडियासमोर आले आहेत.

राजाराम रेगेंची माहिती

जिम इन्स्ट्रक्टर विलास वरक डेव्हीड हेडलीला घेऊन शिवसेना भवनात आला होता. आपली भेट घेऊन हेडलीनं शिवसेना भवन पाहाण्याची विनंती केली. पण शिवसेना भवन कोणालाही पाहता येत नाही, असं आपण त्याला सांगत नकार दिला.

पण त्यानंतर हेडलीनं आपल्याशी वारंवार संपर्क साधला आणि शिवसेना भवनात प्रवेश कसा मिळवता येईल याचे प्रयत्न त्याने केले. तसेच काही प्रोजेक्ट सुरू करण्याबाबतही हेडली सांगत होता. पण त्याच्याकडून कंपनीबाबत माहिती मागितली पण त्याने ती दिली नाही. दरम्यान हेडलीनं आपल्याला दोन ई-मेलही पाठवले होते.

असंही रेगे यांनी सांगितले आहे. तसेच शिवसेना भवनात आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बसत होतो. आपला सेनेशी काहीही संबंध नाही असंही रेगेंनी स्पष्ट केलं.

तसेच हेडली ज्यांच्या संपर्कात होता त्या राहुल भट आणि विलास वरक यांच्याशी आपली ओळख नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर हेडलीची खरी ओळख उघड झाल्यानंतर नॅशनल इन्व्हेस्टिगेटीशन एजन्सीने आपली चौकशी केली होती असं रेगेंनी सांगितलंय.

close