दिल्ली हायकोर्टाबाहेर स्फोट

May 25, 2011 6:34 PM0 commentsViews: 2

25 मे

दिल्लीत कडक सुरक्षा असलेल्या हायकोर्टाच्या परिसरात आज दुपारी स्फोट झाला. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पार्किंगमधल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला.

गेट नंबर सातजवळच्या एका कारजवळ प्लॅस्टिकच्या बॅगेत स्फोटक पदार्थ सापडले आहेत. स्फोटाच्या ठिकाणाजवळ खिळे आणि वायरी सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा स्फोट अपघाताने झाला की हा दहशतवादी हल्ला होता यादृष्टीनंही पोलिसांचा तपास सुरू आहे.

close