आर्थिक मंदीचा पिंपरी चिंचवडला फटका

November 11, 2008 12:57 PM0 commentsViews: 4

11 नोव्हेंबर, पिंपरी चिंचवडसागर शिंदेपिंपरी चिंचवड हे शहर उद्योगनगरी म्हणून ओळखलं जातं. पण आता या उद्योगनगरीला आथिर्क मंदीचा जोरदार फटका बसतोय. बजाज, मर्सिडिज सारखे उद्योग पिंपरी चिंचवड शहरातून स्थलांतरीत होत आहेत. आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचं जकातीचंही नुकसान होतं आहे.पिंपरी चिंचवड शहरातून बजाज,मर्सिडीज अशा मोठ्या कंपन्या स्थलांतरीत होतायत. सहाजिकच पिंपरी चिंचवड महापालिकेला जकातीच्या मार्फत मिळणारा कोट्यावधींचा रूपयांचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे आता जकात धोरण बदलून मोठया उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने सुरू केला आहे. त्या दृष्टीने जकातीच्या दरात सुसूत्रता आणण्यासारख्या उपायांची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.मोठे उद्योग शहराबाहेर जातायत. त्यामुळे त्यावर अवलंबून असणारे लघुउद्योगही पिंपरी चिंचवड शहरातून स्थलांतरीत होत आहेत. जे लघुउद्योग तर स्थलांतरीत होऊ शकत नाहीत, ते हे उद्योग नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मोठ्या उद्योगांबरोबरच लघुउद्योगातल्या कामगारांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तीस-तीस वर्ष इकडे काम केल्यावर आम्ही एकदम उठून जायचं कुठे ? , हा प्रश्न आता कामगारांना सतावत आहे.आर्थिक मंदीची सुरुवात झाली अमेरिकेत. पण मंदीपासून भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षीत असल्याची ग्वाही पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी वारंवार दिली होती. पण कितीही प्रयत्न केले, तरी आर्थिक मंदीचा फटका भारतातल्या सामान्य माणसाला बसणारच, हेच या निमित्तानं स्पष्ट झालं आहे.

close