मुंबई इंडियन्स आणि कोलकाता आमने सामने

May 25, 2011 9:58 AM0 commentsViews: 1

25 मे

आज आयपीएलमध्ये दुसरी प्ले ऑफ खेळवली जाणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या टीम दरम्यान. या मॅचमधील पराभूत टीम स्पर्धेबाहेर जाईल. त्यामुळे या मॅचला एलिमिनेटर म्हटलं जातं आहे.

मुंबईच्या होम ग्राऊंडवर वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होईल. त्यामुळे घरच्या मैदानाचा फायदा मुंबईची टीम उठवू शकेल. शिवाय शेवटच्या लीग मॅचमध्ये कोलकाता टीमवर त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास दुणावला आहे.

दुसरीकडे हातातली मॅच गेल्यामुळे कोलकाता टीमही पेटून उठली आहे. त्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये लक्ष्मीपती बालाजीने 23 रन दिले होते. त्यामुळे कोलकाताचा पराभव झाला. कागदावरही दोन्ही टीम तुल्यबळ आहेत. त्यामुळे लीग मॅच सारखीच ही मॅचही उत्कंठावर्धक होईल अशी आशा फॅन्सना आहे.

close