रस्ता रुंदीकरणावरून पोलीस आणि व्यापार्‍यांमध्ये धक्काबुक्की

May 25, 2011 10:52 AM0 commentsViews:

25 मे

ठाण्याच्या घोडबंदर रोडवर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरणात कामात काही व्यापार्‍यांची दुकान हटवली जात आहे. पण दुकानं हटवण्याआधी पर्यायी जागा देण्याची मागणी करत आज व्यापार्‍यांनी ही कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलीस आणि व्यापार्‍यांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांच्या संरक्षणात दुकानं तोडण्याचे काम सुरू आहे. मात्र व्यापार्‍यांनी विरोध कायम ठेवत या रस्त्यावर उतरत आंदोलन केलं.

close