नाशकात कब्रस्तानच्या जागेसाठी टोलावाटोलवी सुरूच

May 25, 2011 10:58 AM0 commentsViews: 2

25 मे

नाशिकमधील सिडकोत कब्रस्तानच्या जागेसाठी सिडको आणि महापालिका प्रशासन यांच्यात टोलवाटोलवी सुरूच आहे. महासभेत हा प्रश्न सोडवू असं आश्वासन महापालिका प्रशासनानं दिलं होतं.

मात्र महासभेतही हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची महापौरांनी घोषणा केली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत चर्चा करण्यात आली. महापालिके ने पार्कच्या जागेवर न्यायालयात वाद सुरू असल्याने ती देण्यास बहुतांश सदस्यांनी विरोध केला. राजकीय दबावामुळे कब्रस्तानच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाल्याची तक्रार शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली.

close