वाघ्याचा पुतळा हटवण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

May 25, 2011 6:34 PM0 commentsViews: 2

25 मे

पुण्यातील लाल महाल मधील दादोजींचा पुतळा हटवल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याचा इशारा दिला आहे. 6 जूनपर्यंत वाघ्याचा पुतळा हटवला नाही तर आम्ही तो उद्‌ध्वस्त करू असा इशाराच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या उंची इतकीच वाघ्या कुत्र्याच्या समाधीची उंची आहे. वाघ्या कुत्रा हे पात्रच मुळी अनऐतिहासिक आहे. राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास नाटकावरून ते उचलण्यात आलं आहे. त्याला कोणताही ऐतिहासिक अधिकार नाही असा दावा संभाजी ब्रिगेडने यावेळी केला.

close