सोनवणे जळीत हत्याकांडात 7 आरोपी जामीन

May 25, 2011 1:23 PM0 commentsViews: 1

25 मे

यशवंत सोनावणे जळीत हत्याकांड प्रकरणातल्या सर्व आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. नाशिक कोर्टाने या सर्व 7 आरोपींना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात एकूण 11 आरोपी होते. त्यातला पोपट शिंदे या मुख्य आरोपीचा मृत्यू झाला.

मनमाडला 25 जानेवारीला अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांची जाळून हत्या करण्यात आली होती. पेट्रोल माफिया पोपट शिंदे याने ही हत्या केली होती. त्यानंतर मनमाड आणि आसपास सुरू असलेल्या तेल माफियांचा विषय पुढे आला. सोनवणे हत्याकांडातल्या आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होता.

दरम्यान या पूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सीबीआयने पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळली आणि या सगळ्या आरोपींची जामीनावर मुक्तता झाली.

close