कसाबची सुरक्षा आता महाराष्ट्र पोलिसांकडे

May 25, 2011 1:44 PM0 commentsViews: 4

25 मे

26/11चा हल्ला हा मुंबईवरच नव्हे तर देशावरचा हल्ला होता त्यामुळे कसाबच्या सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी जितकी राज्यसरकारची तितकीच केंद्रसरकारचीही आहे. असं गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

कसाबच्या सुरक्षेसाठी इंडो तिबेटियन पोलीस फोर्सच्या बिलात सवलत देण्याची मागणी केंद्रसरकारकडे करण्यात आली आहे. तसेच आयटीबीपीएफच्या ऐवजी राज्याच्या पोलिसांची सुरक्षाव्यवस्था कसाबला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी आयटीबीपी धर्तीवर राज्यातल्या कमांडोंना प्रशिक्षण देऊन फोर्स तयार करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. अशी माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली. आयटीबीपीएफनं कसाबच्या सुरक्षाखर्चाचं 10 कोटींचं बिल राज्यसरकारला पाठवले आहे.

close