पुस्तक लिहून शिस्तभंग केलेला नाही – खोपडे

May 25, 2011 4:32 PM0 commentsViews: 4

25 मे

मुंबई जळाली भिवंडी का नाही ? हे पुस्तक लिहून आपण शिस्तभंग केलेला नाही. मी माझ्या मतांवर ठाम आहे असं या पुस्तकाचे लेखक आणि सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी सांगितलं आहे.

खोपडेंच्या पुस्तक प्रकाशनानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी विचारणा अप्पर पोलीस महासंचालक सत्यपाल सिंह यांनी केली होती.

तसेच पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनीही पुण्यात बोलताना खोपडेंवर कारवाईचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर खोपडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

close