मोदींच व्हायब्रंट गुजरात अभियान सुरू

November 11, 2008 1:05 PM0 commentsViews: 8

11 नोव्हेंबर मुंबई स्वातीदेशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असणा-या उद्योगक्षेत्रांना सध्या मंदीची झळ जाणवत आहे. देशातली बरीच राज्य सरकारं उद्योगक्षेत्राला आर्थिक मंदीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही आता आपल्या राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी सरसावले आहेत. या अंतर्गत त्यांनी व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमाची आखणी केली आहे. जानेवारीत गुजरातमध्ये होणा-या या कार्यक्रमाला देश-विदेशातून गुंतवणूकदार येणार आहेत. गुंतवणूकदारांना गुजरातकडे आकर्षित करण्यासाठी नरेंद्र मोदींनी मुंबईपासून सुरुवात केली आहे.टाटा मोटर्ससारख्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आणण्यात मोदी यशस्वी ठरलेत, पण आर्थिक मंदीच्या या काळात अधिकाधिक गुंतवणुकीचा फायदा राज्याला मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नॅनोसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर अनेक उद्योगांना आता गुजरात राज्य गुंतवणुकीसाठी योग्य असू शकतं असा विश्वास वाटतोय. मोदींच्या अशा प्रचारानंतर व्हायब्रंट गुजरातच्या निमित्तानं अधिक गुंतवणूकदार गुजरातकडे वळतील अशी शक्यता दिसत आहे.

close