चोपडा बँकेचा परवाना रद्द

May 25, 2011 4:41 PM0 commentsViews: 1

25 मे

चोपडा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकप्रकरणी सुरेश बोरोले यांना चपराक बसली आहे. रिझर्व बँकेनं चोपडा बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. बोरोले या बँकेचे चेअरमन आहेत. बोरोले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे व्याही आहेत. याआधीही बोरोले हे तापी पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणात आरोपी आहेत. सुप्रीम कोर्टाने तापी प्रकरणात बोरोले पिता पुत्राचा अटकपूर्व जामीन या अगोदरच फेटाळला आहे.

close