बिपाशा बासूची कस्टमच्या ताब्यातून सुटका

May 26, 2011 9:35 AM0 commentsViews: 10

26 मे

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूला सहार विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. लंडनहून परतत असताना बिपाशाने सुमारे 65 हजार रुपयांच्या काही वस्तू आणल्या होत्या. यामध्ये सनग्लासेस आणि परफ्यूम्सचा समावेश होता.

याची कस्टम ड्युटी बिपाशाने भरली नव्हती. त्यामुळे तिला अडवण्यात आलं होतं. अशी माहिती कस्टम्सच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र तिने ही ड्युटी भरल्यानंतर तिला सोडून देण्यात आलं. या ड्युटीशिवाय तिच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड वसूल करण्यात आला नाही अशी माहितीही कस्टम्सकडून देण्यात आली.

close