इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याचा आणखी एका गुन्ह्यात सहभाग

November 11, 2008 1:07 PM0 commentsViews: 2

11 नोव्हेंबर, मुंबईअजित मांढरे, सुधाकर कांबळेमुंबई क्राईम ब्रँचनं इंडियन मुजाहिद्दीनच्या 20 अतिरेक्यांना अटक केली होती. त्या अतिरेक्यांकडून मुंबई पोलिसांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश येतंय. अशाच एका कोलकात्यातील गुन्ह्यात या अतिरेक्यांचा हात असल्याचं उघड झालं आहे. इंडियन मुजाहिद्दीनचे 20 अतिरेक्यांना मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी देशाच्या कानाकोपर्‍यातून अटक केली आहे. देशात झालेल्या अतिरेकी कारवायात ह्या दहशतवाद्यांचा आहे का, याचा तपास मुंबई क्राईम ब्रँच गेल्या काही दिवसांपासून करत होती. याच तपासातून कोलकात्यात अतिरेक्यांनी केलेल्या एका हल्ल्यात या 20 अतिरेक्यांपैकी एक असलेल्या सादिक याचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. इंडियन मुजाहिद्दीन ही अतिरेकी संघटना स्थापण्यात मोहम्मद सादिकचा महत्त्वाचा वाटा आहे. मोहम्मद सादिक आणि त्याच्या साथीदारांनी 2001 साली कोलकात्यात जो दहशतवादी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 16 जण गंभीर जखमी झाले होते.

close