गौतम गंभीर विंडीज दौरा मुकण्याची शक्यता

May 26, 2011 10:25 AM0 commentsViews: 1

26 मे

कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन आणि वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी निवडण्यात आलेला टीम इंडियाचा कॅप्टन गौतम गंभीर विंडीज दौर्‍याला मुकण्याची शक्यता आहे. गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स बरोबर झालेल्या मॅचमध्ये गंभीरच्या खांद्याला दुखापत झाली.

गौतमला 4 ते 6 आठवडे विश्रांतीची गरज असल्याचा सल्ला कोलकाताचे फिजीओ एन्ड्र्यू लिपस यांनी बीसीसीआयला दिला. तरी तो आयपीएलमध्ये खेळत आहे.

यावर निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयची आज बैठक होणार असून यात गंभीरच्या खेळण्याबद्दल निर्णय होणार आहे. जर गंभीर विंडीज दौर्‍यासाठी मुकला तर त्याच्या ऐवजी सुरेश रैना वन डे सीरिजसाठी कॅप्टन असणार आहे.

close