सुशीलकुमार शिंदेंनी आरोप फेटाळले

May 26, 2011 8:51 AM0 commentsViews: 11

26 मे

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी आज माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं.या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आदर्श सोसायटीच्या 51 सदस्यांच्या वाढीव यादीला मंजुरी दिल्याचा आरोप फेटाळला आहे.

सदस्यांची पात्रता तपासण्याचे काम जिल्हाधिकारी आणि इतर अधिकार्‍यांचं होतं.त्यांनी छाननी करुन यादी मंजूर करण्याची शिफारस आपल्याला केली. आणि 18 जानेवारी 2003 चं लेटर ऑफ इंटेट हे आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी जारी झालं होतं असं सुशील कुमार शिंदेंनी म्हटलं आहे. याच्याच आधारे पुढची सर्व कार्यवाही झाली.

याचा अर्थ असा होतो की 18 जानेवारी 2003 ला विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला आणि जाता जाता त्यांनी लेटर ऑफ इंटेंट जारी केलं. तसेच सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात कुणीही आदर्श सोसायटीत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आणून दिलं नाही.

प्रकाश पेठे मार्गाची रुंदी कमी करणे किंवा आदर्शला वाढीव एफएसआय देणं याच्याशी आपला कुठलाही संबंध नाही. असंही सुशील कुमारांनी स्पष्ट केलं आहे. ही जमीन राज्य सरकारचीच आहे. यीआरझेड 2 मध्ये ती मोडते.

तसेच या सोसायटीचा कारगिलशी कसलाही संबंध नाही. हे लेटर ऑफ इंटेंटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. असं सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलंय.

तसेच 2004 च्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या काळात आदर्शला कुठलीही सवलत किंवा परवानगी दिलेली नाही असाही दावा सुशीलकुमार शिंदेंनी केला.

दरम्यान आदर्श सोसायटीप्रकरणी सुनील तटकरे यांनीही प्रतिज्ञापत्र दाखल केलं. फक्त 7 पानाचे हे प्रतिज्ञापत्र आहे. 14 जुलै 2004 च्या नगर विकास खाताच्या बैठकीचा हवाला देत अतिरीक्त एफएसआय दिला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

close