26/11 च्या हल्ल्यामागे आयएसआयचा हात !

May 26, 2011 11:00 AM0 commentsViews: 2

26 मे

डेव्हिड हेडलीच्या जबाबतून आयएसआयचा मुंबई हल्ल्यात हात आहे हे आता आणखी स्पष्ट होतं आहे. मुंबईवर झालेला हल्ला होत होता. आणि लष्कर-ए – तोएबाचा साजीद मीर हे पाहून संतापत होता. कारण हल्लेखोर चुका करत होते आणि पुरावेही सोडत होते. ठरलेल्या कटाप्रमाणे हल्लेखोरांकडून काम होत नसल्याचे पाहून मीर अस्वस्थ होत होता.

अशी माहिती डेव्हिड हेडलीनं शिकागो कोर्टात दिली. त्यामुळेच मुंबई हल्ल्यात आयएसआयचा हात आहे हे आणखी स्पष्ट होत चाललंय. मेजर इक्बालने भारतात हल्ला करण्यासाठी त्याला भारतीय चलनही पुरवलं अशी माहितीही हेडलीनं दिली. हल्लेखोर हिंदू वाटावेत यासाठी आपण 15 लाल रंगाची ब्रेसलेट्स घेतली असंही हेडलीने सांगितलं.

खरं तर आपल्याला काश्मीरमध्ये हल्ला करायला आवडलं असतं. पण हल्ल्याच्या सूत्रधारांना आपण त्याहीपेक्षा मोठी कामगिरी बजावू शकतो असं वाटलं त्यामुळेच त्यांनी आपल्याला मुंबईत पाठवले अशी माहितीही त्याने दिली.

close