सरकारने प्रतिसाद न दिल्यास उपोषण सुरूच ठेवणार – मेधा पाटकर

May 26, 2011 11:14 AM0 commentsViews: 4

26 मे

मुंबईतील सांताक्रूझ गोळीबार येथील पुर्नविकासाच्या नावाखाली स्थानिक लोकांना बेघर केलं जात आहे. त्याविरोधात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केलं आज या उपोषणाचा सातवा दिवस आहे. सरकारकडून कुठल्याही प्रकारचा, सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय मेधा पाटकरांनी घेतला आहे.

मुंबई उपनगरचे कलेक्टर प्रकाश महाजन यांनी आज मेधा पाटकर यांची भेट घेतली. दरम्यान, या समस्येवर काहीतरी तोडगा निघेल, असं गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी म्हटलंय.

एस.आर.ए. मधील क्रिटीक कलम रद्द करावे, राजीव गांधी आवास योजना लागू करावी. किंवा शिवालिक व्हेंन्चर ची कसून चौकशी करावी आणि एस.आर.ए.च्या कायद्यातील तृटी दुरुस्ती करण्यात यावी अशी या आंदोलकांच्या मुख्य मागण्या आहेत.

काल काही वरीष्ठ अधिकार्‍यांसोबत मेधाताई आणि आंदोलकांची चर्चा झाली पण त्यातून काहीही तोडगा निघाला नाही. तर दुसरीकडे उपोषणादरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली आहे.

मेधा पाटकर यांना आता ताप आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे. पण त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं नाही. डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला असला तरी मेधा पाटकरांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान काल बुधवारी आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात मेधा पाटकर यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली.

close