गुजरातमध्ये दूधापेक्षा दारूचा महापूर – अण्णा हजारे

May 26, 2011 12:33 PM0 commentsViews: 3

26 मे

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची काही दिवसांपूर्वी प्रशंसा करणार्‍या अण्णा हजारेंनी आज त्यांच्यावर घणाघाती टीका केली. गुजरातमध्ये भ्रष्टाचाराला ऊत आल्याचा आरोप त्यांनी केला.

गांधीजींच्या गुजरातमध्ये दूधापेक्षा दारूचा महापूर वाहत असल्याचं ते म्हणाले. महिन्याभरापूर्वीच अण्णांनी मोदींना चांगला प्रशासक म्हटलं होतं. आणि त्यावरून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी सुरू केलेली यात्रा आता गुजरातमध्ये पोहचली आहे.

close