ऑस्ट्रेलियन टीमला जबर दंड

November 11, 2008 1:08 PM0 commentsViews: 2

11 नोव्हेंबर नागपूर ऑस्ट्रेलियन टीमने बॉर्डर – गावस्कर ट्रॉफी तर गमावलीच शिवाय स्लो ओव्हर्स रेटसाठी टीमवर जबर फाइनही लावण्यात आला आहे.कॅप्टन रिकी पाँटिंगची तर 20 टक्के मॅच फी कापण्यात येणार आहे. तर इतर टीम सदस्यांची दहा टक्के मॅच फी कापण्यात येईल. नागपूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमने ओव्हर्सची योग्य गती राखली नव्हती. त्यामुळे टेस्टच्या चौथ्या दिवशी कॅप्टन रिकी पाँटिंगने टी नंतर त्यांच्या प्रमुख फास्ट बॉलर्सना विश्रांती दिली आणि क्रेझा, मायकेल क्लार्क या स्पिनरचा वापर जास्त केला. भारतीय बॅट्समननी या बॉलर्सना आरामात खेळून काढलं आणि रन्स वाढवले. पाँटिंगच्या याच निर्णयावर ऑस्ट्रेलियन मीडियाने टीका केली आहे. जर ओव्हरचा रेट योग्य राखला गेला नसता तर नियमांनुसार पाँटिंगवर कदाचित एक टेस्टची बंदी आली असती. ही बंदी टाळण्यासाठी पाँटिंगने स्पिनर्सना बॉलिंग दिली. त्याच कारणामुळे त्यांना भारताला ऑल आऊट करता आलं नाही, अशी टीका ऑस्ट्रेलियन मीडियाने केली आहे.

close