गोव्यात आदिवासींच्या आंदोलनामुळे तणावपूर्ण शांतता

May 26, 2011 2:05 PM0 commentsViews: 1

26 मे

सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोव्यात आदिवासींचं आंदोलन पेटलं आहे. पणजीतल्या बाळ्ळी इथं 10 हजार आदिवासींनी काल आंदोलन केलं. पोलिसांना तिथं दोन जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले आहे.

बाळ्ळीत आदिवासी आणि स्थानिक यांच्यात संघर्ष झाला. त्यानंतर स्थानिकांनी बाळ्ळीतल्या आदर्श सोसायटीला काल आग लावली आणि त्याचे शटर बंद केले. त्यात दोन आदिवासी कार्यकर्त्यांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. बाळ्ळीत परिस्थिती नियंत्रणात असली तरी तिथं तणापूर्ण शांतता आहे.

close