कोल्हापूरमध्ये नगरसेवकांवर मधमाश्यांचा हल्ला

May 26, 2011 4:30 PM0 commentsViews: 1

26 मे

कोल्हापुरातल्या राजारामपुरी परीसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवत होती. त्यामुळे इथं असणार्‍या पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेनं भरते की नाही यांची पाहाणी करण्यासाठी नगरसेवीका तृप्ती माळवी, संगीता देवेकर, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, नगरसेवक राजु हंबे,माजी नगरसेवक सुरेश ठोणुक्षे हे पाण्याच्या टाकीवर गेले होते.

पाण्याच्या टाकीला असणार्‍या लोखंडी जिण्यावरुन जाताना अचानक मधमाशाचे पोळ उठले आणि मधमाशांनी ह्या सगळ्या नगरसेवकांवर हल्ला चढवला. यामध्ये सर्व नगरसेवक पटकण खाली उतरले पण नगरसेविका तृप्ती माळवी आणि संगीता दिवेकर यांना उतरता आलं नाही.

त्यामुळे तृप्ती माळवी आणि संगीता दिवेकर यांच्यावर मधमाश्यानी कडाडुन हल्ला चढवला. त्यामध्ये तृप्ती माळवी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. माळवी यांच्याह चार जणांवर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

close