पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग वॉर !

May 26, 2011 4:43 PM0 commentsViews: 28

26 मे

पुणे महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुका प्रभाग पद्दतीनं होणार असल्याने तसेच 2 वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने राजकीय पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. 50 टक्के महिला आरक्षणामुळे आता महापालिकेत 72 नगरसेविका निवडून जातील.

2 वॉर्डांचा एक प्रभाग असावा असी राष्ट्रवादीची मागणी होती तर 4 वॉर्डांचा प्रभाग असावा असा काँग्रेसचा आग्रह होता. पण काँग्रेस असो वा राष्ट्रवादी , शिवसेना असो वा मनसे सर्वांनी मतदार आपल्यालाच कौल देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

सध्या राष्ट्रवादीचं पालिकेवर वर्चस्व आहे तर काँग्रेस कलमाडींच्या अटकेमुळं बॅकफूटवर आहे. भाजपसोबत कदाचित आरपीआयशी पण आगामी निवडणुकीत युती होऊ शकते म्हणून सेना आशावादी आहे तर मनसेचं इंजिन पण जोरात आहे.

close