कोल्हापूरमध्ये स्थानिक कराला व्यापार्‍यांचा कडाडून विरोध

May 26, 2011 5:10 PM0 commentsViews: 2

26 मे

स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी करताना सर्वप्रकारचे सहकार्य करण्याची हमी राज्य सरकारने दिली असतानाही कोल्हापुरात व्यापार्‍यांनी या कराला कडाडून विरोध केला आहे. जोपर्यंत हा कर हटवला जाणार नाही, तोपर्यंत शहरात मालाची आवक करणार नाही अशी भूमिका व्यापार्‍यांनी घेतली आहे.

जकातीला पर्याय म्हणून राज्यातल्या 16 ड वर्ग महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानूसार जळगाव, नांदेड, मीराभाईंदर, कोल्हापूर, सोलापूर आणि वसई-विरारमध्ये या कराची अंमलबजावणी सुरू झाली.

पण या कराला कोल्हापुरातल्या व्यापार्‍यानी तीव्र विरोध करायला सुरवात केली आहे. दरम्यान व्यापार्‍यांच्या भूमिकेमुळे शहरात अन्नधान्याची टंचाई होईल ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा ग्राहक पंचायतीने दिला आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था करामधील जाचक अटी राज्य सरकार रद्द करत असेल तर त्यांचे स्वागत केलं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.

close