कोकण किनार्‍यावर 24 किलोमीटरची प्राचीन भिंत

May 26, 2011 5:20 PM0 commentsViews: 2

26 मे

सिंधुदुर्ग-रायगड जिल्हयातील श्रीवर्धनपर्यंतच्या 225 किलोमीटरच्या कोकण किनारपट्टीवरील समुद्रात 13 पुरातन भिंती आढळून आल्या आहे. समुद्रसपाटीच्या खाली तीन मीटर उंचीची आणि 2.5 मीटर रुंद अशी एकूण 24 किलोमीटर लांब भिंत आहे.

या भिंती जवळपास आठ हजारपूर्वीच्या म्हणजे मोहन्जोदडोपेक्षाही पुरातन असल्याचं आता सिद्ध झालं आहे. डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट ऍण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे डॉ.अशोक मराठे यांनी एका संशोदनाद्वारे हे सिध्द केलं आहे.

मराठे यांचं हे संशोधन 2005 ते 2011 पर्यंत सुरू होतं. या भिंती नैसर्गिक नसून त्या मानवनिर्मित असल्याचा दावाही मराठे यांनी यावेळी केला. पुरातत्व विभागाकडून मात्र यावर आत्तापर्यंत कोणतंही संशोधन झालेलं नाही.

close