मुंबईत गोदामाला आग

November 11, 2008 3:16 AM0 commentsViews: 7

11 नोव्हेंबर, मुंबईमुंबईतल्या अंधेरी भागातल्या एका लाकडाच्या गोदामाला सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागली. ही आग एवढी भीषण होती की ती विझवण्यासाठी फायरब्रिगेडच्या जवानांना जवळपास तीन तास लागले. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र लाखो रुपयाचं नूकसान झालं आहे. 12 फायर इंजीन आणि 8 पाण्याचे टॅकर या कामी लावण्यात आले होते.या आगीच कारण अजून समजू शकलेल नाही.

close