मुंबईत हेडलीने वापरला अमेरिकेन मोबाईलनंबर !

May 27, 2011 11:38 AM0 commentsViews: 3

27 मे

शिकागो कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात डेव्हिड हेडलीच्या साक्षीचा काल चौथा दिवस होता. मुंबई हल्ल्यामागे आयएसआयचा हात असल्याची माहिती हेडलीनं कालही दिली. आपण मुंबईत असताना मेजर इक्बाल पाकिस्तानातून आपल्या संपर्कात होता.

तसेच त्यानं यासाठी एका अमेरिकन मोबाईलनंबरचा वापर केला होता. पण या हल्ल्याचा तुला गर्व वाटतो का असा प्रश्न वकिलांनी त्याला विचारल्यावर त्यानं नाही असं उत्तर दिलं.

तसेच यासंदर्भात 50 बैठकांना आपण उपस्थित होतो असंही त्यांने सांगितलं आहे. तसेच यापैकी एका बैठकीला पाकिस्तानच्या नौदलाचा एक अधिकारीही उपस्थित होता असं हेडलीनं सांगितलं आहे.

close