खेळाडूंनी दुखापतीबद्दल बीसीबीआयला अंधारात ठेवू नये – हरभजन सिंग

May 27, 2011 10:20 AM0 commentsViews: 10

27 मे

कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन गौतम गंभीरच्या दुखापतीमुळे अनेक वाद उफाळून येत आहे. गौतम गंभीरला झालेल्या खांद्याच्या दुखापतीबद्दल सुरु असलेल्या चर्चेत भारताचा स्पीनर हरभजन सिंगनंही उडी घेतली आहे.

दुखापतीबद्दल खेळाडूंनी बीसीसीआयला अंधारात ठेऊ नये असं हरभजननं म्हटलंय. पैशांसाठी गंभीरनं दुखापत लपवली की फँचाईजीनं गंभीरसाठी रिपोर्ट दडपला असा नवा वाद त्यामुळे सुरु झाला आहे.

वेस्ट इंडिजच्या दौर्‍यात बीसीसीआयने त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे. पण तो खेळणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.

या वादावर गौतम गंभीरने एका वृत्तपत्राशी बोलताना त्यानं म्हटलंय. 'दुखापतीची तीव्रता लक्षात न येताच मी खेळत राहिलो. टीमचा लीडर म्हणून मला तसं करणं गरजेचं होतं.

पण मी देशापेक्षा क्लबला महत्त्व दिलं असं म्हणणं चुकीचं आहे. मी जाहीर वक्तव्य करणे योग्य नाही, पण मला तसं करावं लागतंय. आयपीएलमध्ये येताना मला दुखापत नव्हती. दुखापतीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे करिअरशी खेळ हे कोणत्याही क्रिकेटरला चांगलं समजतं.'

close