कतरिना म्हणते, मेकअप शिवाय नको गं बाई..!

May 27, 2011 3:14 PM0 commentsViews: 13

पल्लवी पॉल मुंबई

27 मे

सगळ्यात सुंदर स्त्री असण्याचा बहुमान मिळवल्या नंतर कतरिना कैफने आनंद तर व्यक्त केला. ज्या मासिकाने कतरिनाला हा बहुमान बहाल केला त्या मासिकाच्या उद्घाटनाला कतरिना हजर होती यावेळी तिने तिच्या सलमान सोबत असलेल्या आगामी सिनेमाबद्दल आम्हाला सांगितलं.

कतरिना कैफनं नुकतंच एका मासिकाचं उद्घाटन केलं. हे तेच मासिक होतं ज्यानं तिला यावर्षाचा सर्वोत सुंदर स्त्रीचा किताब बहाल केला. पण सर्वात सुंदर स्त्रीचा बहुमान मिळवलेल्या कतरिनाने मात्र मेकअप शिवाय कॅमेरासमोर यायला आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याची कबुली दिली.

खूप जास्त नसला तरी थोडाफार मेकअप आवश्यक असतो. लाईटसमोर उभं राहायचं असेल तर मेकअप करणं नेहमीच चांगलं. यशराज बॅनरच्या एक था टायगर या सिनेमात कतरिना सोबत तिचा एक्स बॉय फ्रेण्ड सलमान खान दिसणार आहे.

या सिनेमात ती पुन्हा एकदा आपल्याला ग्लॅमर डॉलच्या भूमिकेत दिसणार आहे. पण आता तिला भूमिकांमध्ये चेंज हवा आहे.ग्लॅमरस सिनेमाबद्दल आता बोलणं खूप लवकर होईल.

पण हा खूप मस्त रोल आहे आणि सिनेमातला माझा लूकही वेगळा आणि अधिक ग्लॅमरस आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वात सुंदर स्त्री असण्याचा बहुमान कतरिना कैफ चांगलाच एन्जॉय करतेय असं दिसतंय.

close