ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमवर मीडियाची आगपाखड

November 11, 2008 1:17 PM0 commentsViews: 6

11 नोव्हेंबरऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम विरुद्ध ऑस्ट्रेलियन न्यूज पेपर करत असलेली आगपाखड बघून टीमला मायदेशी गेल्यावर काही दिवस चेहरा लपवावा लागणार हे निश्चित. खास करून कॅप्टन रिकी पाँटिंगवर ऑस्ट्रेलियन मीडिया नाराज आहे. द ऑस्ट्रेलियन न्यूजपेपरने पाँटिंगचं विडंबनात्मक भविष्य लिहिताना त्याला पुढचे दिवस खडतर जाणार असल्याचं म्हटलंय. तर द एज ने आरोप केलाय की पाँटिंगने ट्रॉफी जिंकायची महात्वाकांक्षाच ठेवली नाही. पाँटिंगच्या कप्तानशिपवरही ऑस्ट्रेलियन मीडिया नाराज आहे. मैदानावरचे त्याचे डावपेच आकलना पलीकडचे होते असं सिडने मॉर्निंग हेराल्डने म्हटलंय. तर हेराल्ड सनने या भारत दौ-यात पाँटिंगची कप्तानी सामान्य दर्जाची होती, असं म्हटलंय.

close