सुवेज हक यांच्या बदलीवरून बजरंग दलाचे चक्काजाम आंदोलन

May 27, 2011 4:29 PM0 commentsViews: 6

27 मे

गोंदियाचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांची अचानक चंद्रपूरला बदली झाली. त्यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज शहरात चक्काजाम आंदोलन केलं.

आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुवेज हक यांची बदली रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला. हक केवळ चार 6 महिन्यांपूर्वी गोंदिया इथं रुजू झाले होते.

अल्पावधीतचं त्यांच्या कामाच्या शैलीनं त्यांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवला. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात काळ्या धंद्यांना चाप लावला. तसेच अनेक नक्षलवादीही पकडले गेले.

विशेष म्हणजे पोलीस खात्यातील लाचखोर अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई त्यांनी केली. अश्या अधिकार्‍याची बदली का केली हा प्रश्न विचारत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलंय.

close